मुंबई | 14 वर्ष पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
आज मनसेचा 14 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळा नांदगावकर बोलत होते.
मनसेला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. 14 वर्षांचा हा प्रवास खाचखळग्यांनी जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला, असं बाळा नांदगावकरांनी सांगितलं.
दरम्यान, राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करेल, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल
-मराठीत भाषण न केल्यामुळं मला रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर गंभीर आरोप
-गृहखात्यावर नांदगावकरांची तर जलसंपदावर अनिल शिदोरेंची नजर; पाहा मनसेचं शॅडो कॅबीनेट
-अरे बाबांनो तुम्ही आमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवता, पण मतदान करत नाही- राज ठाकरे
-अदित्य ठाकरेंच्या कामावर लक्ष ठेवणार आता ‘राजपुत्र’