जर विधानसभा लढायचं ठरलं तर स्वबळावर लढू- बाळा नांदगावकर

मुंबई |  विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायला फक्त काही दिवस बाकी आहेत. असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवडणूक लढायची की नाही, हेच आणखी ठरत नाहीये. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. 

निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील. ईव्हीएमबद्दल आमची शंका आहेच. निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर बहुतांश मतदारसंघात आम्ही स्वबळावर लढू, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

36 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांचं मत निवडणुका लढवाव्यात असंच आहे. निवडणुकीसंदर्भातला अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील, असं ते म्हणाले.

आतापर्यंत पक्षाने एकला चलोची भूमिका घेतलेली आहे. अजून ही एकला चलोची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, लवकरात लवकर आम्ही मनसेचा निर्णय जाहीर केला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-