…..हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे; जामिया गोळीबारावर थोरात यांचं मत

मुंबई |  दिल्लीतील जामिया विद्यापीठात CAA विरोधी आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरूणाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एक आंदोलक जखमी झाला असून त्याला रूग्णालयामध्ये दाखल केलं आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने समाजाच्या विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय.

जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीदिनीच दिल्लीत आंदोलकांवर एक माथेफिरू पोलिसांसमक्ष बिनधास्त गोळ्या झाडतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असं त्यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे.

लोकशाहीमध्ये विरोधी आवाज गोळ्या झाडून बंद करण्याचा हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे, अशा भावना त्यांनी ट्वीट करून व्यक्त केल्या आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलकरांवर गोळीबाराचा प्रकार निंदनीय आणि चिंताजनक असल्याचं थोरात म्हणाले आहेत.

दुसरीकडे घडलेल्या या घटनेवर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. दिल्लीमध्ये जामिया परिसरात #CAA_NRCProtests मोर्चापुर्वी एका व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली.दिल्लीमध्ये जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे का? ही घटना अतिशय गंभीर आहे. या गोळीबाराचा निषेध, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-एका नगरसेवकाने घेतली दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी; कोल्हापूर महापालिकेतला प्रकार

-तुकाराम मुंढेंची धडाक्यात कामाला सुरूवात; दिला 4 कर्मचाऱ्यांना दिला

-नथुराम गोडसेला मानतो हे सांगायची मोदींमध्ये धमक नाही – राहुल गांधी

-कोरोना व्हायरस भारतात दाखल; केरळमध्ये पहिला रूग्ण आढळला

-देशप्रेमी नागरिकांनी मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं; बाळा नांदगावकरांचं आवाहन