“…म्हणून महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं”

पुणे | राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार करण्याचा विश्वास शिवसेनेनं दिल्यानं आम्ही त्यांना साथ दिली आणि सरकार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महिनाभरातल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यानंतर प्रथमच थोरातांनी त्यांच्या मदारसंघाला भेट दिली. यावेळी बोलताना थोरातांनी महाविकासआघाडीचं सरकार कसं स्थापन झालं?, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच जनतेचे आभार देखील थोरातांनी यावेळी मानले.

संगमनेरकरांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताने मी भारावून गेलो. तालुक्यातील जनतेचे अलोट प्रेम आणि पाठिंब्याच्या जीवावर मी सलग आठव्यांदा विधानसभेत पोहोचलो, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

जे पक्ष सोडून गेले त्यांची जागा आता नवीन लोकांनी घेतली आहे. त्यामुळे अशा लोकांना पक्षात घेताना नवीन लोकांची अनुकूलता असंल तरच विचार करू. महाविकासआघाडीचं सरकार यावे ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती. आता चांगलं सरकार देण्याची जबाबदारी महाआघाडीवर असून ती पूर्ण करू, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-