आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं?, आतली माहिती आली समोर

पुणे | संगमनेरमधील दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं कौतुकास्पद केलं आहे.

ते दोघे राज्याचं नेतृत्त्व करतात तसंच देशाचंही नेतृत्त्व करतील, अशा शब्दात दोन्हीही युवा नेत्यांचं बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलं. बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं कसं मिळालं याचा किस्सा देखील या कार्यक्रमात सांगितला.

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? काय म्हणाले बाळासाहेब थोरात???

“महाराष्ट्राचं नेतृत्त्व करायचं म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागाची, तिथल्या नव्या प्रयोगांची ओळख असली पाहिजे म्हणून आदित्य ठाकरेंशींशी चर्चा करायची होती. आदित्य ठाकरेंना कोणतं खातं पाहिजे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं.”

मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता. आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेचं पर्यटन सुरु केलं. रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे. पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं, पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

पर्यावरणाचा विषय आहे म्हटल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या या किस्स्याची आता जोरदार चर्चा होताना दिसतेय.

देशपातळीवर काम करण्यासंदर्भात मोठं वक्तव्य-

“पतंगराव कदम यांच्या अचानक जाण्यानं विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी आली. सुरुवातीला जरा काळजी वाटली , परंतु विश्वजीत कदम यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही, असं वाटल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांना पुढील काळात देशपातळीवर काम करण्याची जबाबदारी पडेल. त्यावेळी देखील ते चांगली जबाबदारी पाडतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दंडकारण्य अभियानाचं यंदाचं सोळावं वर्ष आहे. 5 वर्षानंतर आपण याच लावलेल्या झाडाखाली कार्यक्रम घेऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.

हर्मन हिल ही व्यवस्था करतोय, हे सोप काम नव्हतं, 50 एकरवर आपण 157 प्रकारची झाडं लावली आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या उपक्रमाबद्दल ते यावेळी भरभरुन बोलताना दिसले.

उद्धव ठाकरेंचं मोठं कौतुक-

महाविकास आघाडी सरकारचं काम चागलं सुरु आहे, त्याला उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व कारणीभूत आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. आमचं सरकार आलं, सात जणांचा शपथविधी झाला, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केलं. त्या अगोदर शेतकऱ्यांना अनेक अर्ज भरावे लागत होते, अशी माहिती त्यांनी दिली.

ही बातमी वाचली का?-

…तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर

भाऊ जेलमधून सुटला… बहिणीनं फुल्ल टू पार्टी केली, बघा सुहानाचे ते फोटो

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले नवाब मलिकांवर संतापले; म्हणाले, “आमच्या समाजाची…

“ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवारांना हे विचारा”; दाऊदबद्दल मोठा गौप्यस्फोट

“हे पुड्या सोडायचे धंदे सोडून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या”

“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”