रामदास आठवले नवाब मलिकांवर संतापले; म्हणाले, “आमच्या समाजाची…

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष चांगलाच चर्चेचा विषय होताना दिसत आहे. अशात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांनी बाजू घेतली आहे.

समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेला समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर तसेच वडील ज्ञानदेव वानखेडे हजर होते.

रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना समीर वानखेडे यांना आपला पाठिंबा तर दिलाच शिवाय नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका देखील केली. यावेळी समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर देखील संतप्त झालेल्या पहायला मिळाल्या.

काय म्हणाले रामदास आठवले?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

“नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे केलेले आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रे पाहिली आहेत.”, असं रामदास आठवले म्हणाले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार आठवले म्हणाले की, नवाब मलिक हे आरोप लावत आहेत कारण त्यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात होता.”

“समीर वानखेडे हा दलित आहे. जर आर्यनने अंमली पदार्थांचे सेवन केले नसते आणि त्याच्यावर कोणताही खटला नसता, तर न्यायालयाने त्याला इतके दिवस जामीन का दिला नव्हता?”, असा सवाल देखील रामदास आठवले यांनी विचारला आहे.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे आठवले यांना भेटायला गेले होते. यावेळी रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंना आपला पाठिंबा दिला.

“त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे मला त्यांची बाजू घेऊन त्यांना पाठिंबा देण्याची गरज होती,” असं रामदास आठवले म्हणाले.

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी देखील यावेळी आपली भूमिका मांडली.“रामदास आठवले यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे कारण आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली आहेत. नवाब मलिक यांनी केलेले सर्व दावे खोटे सिद्ध झाले आहेत.”

ही बातमी वाचली का?-

…तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर

भाऊ जेलमधून सुटला… बहिणीनं फुल्ल टू पार्टी केली, बघा सुहानाचे ते फोटो

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवारांना हे विचारा”; दाऊदबद्दल मोठा गौप्यस्फोट

“हे पुड्या सोडायचे धंदे सोडून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या”

“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर