“मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये मला पुढचा विरोधी पक्षनेता दिसतो”

मुंबई |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मला पुढचा विरोधी पक्षनेता दिसतो, अशी टीका काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काँग्रेस आमची काय पोल-खोल करणार?? जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला थोरातांनी उत्तर दिलं आहे.

विद्यमान भाजप सरकारला सत्तेचा माज आणि गुर्मी आल्याची टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला उलथवून लावायचं आहे, असं ते म्हणाले.

जे नेते पक्ष सोडून जात आहेत तिथे आमचे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते तयार आहेत. नव्या दमाच्या लोकांना आम्ही संधी देणार आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, वंचित बहुजनशी आघाडी व्हावी असं आम्हाला वाटतंय, असं सांगत त्यांनी चर्चेची दारं अजूनही खुली आहेत, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-