काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या; या प्रकरणी निघालं अटकेचं वॉरंट!

सोलापूर |  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा शिंदे यांच्यावर दोषारोप आहे. याच प्रकरणी जिल्हा न्यायालयात तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलिसांबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली होती. या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

2 जानेवारी 2018 ला सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा रूग्णालयातील महागलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भात दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला होता.

दरम्यान, आम्ही न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-