आपले गडकिल्ले ही छत्रपतींची देण…. हेच वैभव जगाला दिमाखात दाखवणार- उद्धव ठाकरे

मुंबई | बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या वतीने 1976-1977 चे माजी विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार त्यांच्या वर्ग मित्र-मैत्रिणींकडून केला गेला. यावेळी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांचे मित्र अभिनेते अजित भुरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

अजित भुरे यांनी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांना बालपणीच्या अनेक किस्स्यांवर प्रश्न विचारले. यावेळी बालमोहनमधील अनेक आठवणींना मुख्यमंत्री आणि मंत्री पाटील यांनी उजाळा दिला. आपले गडकिल्ले ही छत्रपती शिवाजी राजांची आपल्याला सर्वांत मोठी देण आहे. हेच वैभव मी जगाला दिमाखात दाखवणार, असं म्हणत गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी आठवणही उद्धव यांनी करून दिली.

आपल्याच शाळेत आपल्या शिक्षकांसमोर, आपल्या वर्गमित्रांसमोर आपला सन्मान होणं ही बाब आपल्यासाठी सन्मानाची आहे. आज उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं नाही कारण आजची मुलं हुशार आहेत, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला अनेक जण विचारतात आज मिनाताई आणि बाळासाहेब असते तर त्यांना कसं वाटलं असतं. पण मला वाटतं की प्रत्येक पालक आणि त्यांच्या मुलांमधलं नातं हे शब्दांच्या पलीकडचं असतं. त्यामुळे माझे पालक जरी आज माझ्यासोबत नसले तरी प्रत्येक पावलावर त्यांची आठवण मला येत असते, असंही उद्धव म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक… मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिल अन् भावाने केली आत्महत्या!

-आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अनुसुचित जाती जमातींवर अन्याय करणारा- आठवले

-ती आपल्याला कायमचं सोडून गेली…; आनंद महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल

-आपल्या घरात ‘असा’ नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली- अजित पवार

-प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपीला 1 महिन्यात फाशी द्या- नवनीत राणा