3 वर्षे कॉलिंगसाठी साधा मोबाईल वापरला; अडीच वर्षात क्रॅक केल्या 4 स्पर्धा परीक्षा!

पुणे | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कॉलिंगसाठी ३ वर्षे साधा मोबाईल वापरला आणि अडीच वर्षात ४ स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या. बारामतीच्या आरती राजेंद्र पवार हिनं ही किमया केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरतीनं डीवायएसपी पद मिळवलं आहे.

एनटीबी या कॅटेगरीतून राज्यात प्रथम येण्याचा मान देखील तीने मिळवला आहे. याआधी तिची अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी आणि कर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. मात्र त्यावर समाधान न मानता तिनं आता Dysp पदाला गवसणी घातली आहे.

आरतीचं कुटुंब मूळचं पुण्याच्या दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील, तिचं प्राथमिक शिक्षण देऊळगावगाडा येथे झालं, मात्र वडील बारामतीजवळीत झारगरवाडी येथे शिक्षक असल्यानं तिचं पुढील शिक्षण बारामतीत झालं.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मी सोशल मीडियापासून दूर राहिले. आई-वडिलांनी मला फ्री हँड दिला होता, तसेच त्यांचं मार्गदर्शनही मोलाचं ठरलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना क्लास लावणं गरजेचं नाही, असं आरती पवारनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-वारीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा

-…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा

-“मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या”

-ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

-शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!