वारीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा

पंढरपूर | आषाढी वारीच्या काळात नेहमीप्रमाणे चोख बंदोबस्त करण्यात ठेवण्यात येणार आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणारे पोलीस अधिकारी तसंच कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तंदुरूस्त पोलीस कर्मचाऱ्यांकडे यंदाच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात येणार आहे

पंढरपूरमधील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थितीत पाहता आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र तरीही नित्योपचार आणि पुजा सुरु राहणार आहे.

देहू तसंच आळंदीहून येणाऱ्या संताच्या पालखी आणि दिंड्याही येतील. भाविकांची होणारी अनावश्यक गर्दी लक्षात घेता संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरात आणल्या जातील. तसंच विविध भागातून येणाऱ्या भाविकांमुळे संसर्गाचा धोका ओळखता पंढरपूरात 15 ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

दरम्यान, या वारीच्या बंदोबस्तासाठी जवळपास 1 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी असतात. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेता पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोनाच्या दृष्टीने आरोग्य चाचणी होईल.

महत्वाच्या बातम्या-

-…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा

-“मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या”

-ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

-शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

-बापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं!