सुशांत प्रकरणी ‘ती’ खेळी शरद पवारांचीच?; ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बेस तयार केला जातोय’

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय आणि एनसीबी सारख्या उच्च दर्जाच्या एजन्सी शोध घेत आहेत. मात्र, तरीही सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच जात आहे. याप्रकरणी अनेकजण रोज नवनवीन खुलासे करत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील काही राजकीय नेत्यांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी पहायला मिळाली आहे. याप्रकरणी अनेक नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता सुशांत प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

नुकतंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

प्रियंका आणि मीतू यांनी ही तक्रार रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र हा गु.न्हा रद्द करण्यास मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रावरूनच निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त CBI ला डिवचलं नाही, तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे, असं निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राणे यांच्या या ट्वीटनंतर एकंच खळबळ उडाली आहे.

सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह यांनी मुंबई हाय कोर्टात रियानं दाखल केलेली तक्रार रद्द करण्यासाठी जी याचिका दाखल केली आहे, ती याचिका रद्द करावी अशी मागणी मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

दरम्यान, 8 जूनला सुशांतने बहिणीसोबत केलेलं चॅटिंग मला दाखवली होती. सुशांतच्या बहिणीने त्याला काही औषधे घ्यायला सांगितली. सुशांतची बहिण दिल्लीतील डॉक्टरांच्या मदतीने सुशांतला प्रतिबंधक औषधे देत होती, असं रियानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असा आरोप रियाने एफआयआरमध्ये केला आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायला हवी. बहिणीने सल्ला दिलाय म्हणून औषधे घेऊ नकोस कारण तिच्याकडे मेडिकल डिग्री नाही, असंही रियानं यावेळी सुशांतला बजावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अर्णब गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! म्हणाले राज्यात पत्रकारितेला…

दिल्लीच्या संघाने केलेल्या ‘या’ चुकीमुळे कोलकत्ता टीम आयपीएल बाहेर गेली!

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याचा ऐन तारुण्यात मृ.त्यू

सारा अली खानची ‘ती’ गोष्ट सलमानला आवडली तेव्हा साराला मिठी मारत सलमानने…