सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुशांतची कथित एक गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

8 जूनला सुशांतने बहिणीसोबत केलेलं चॅटिंग मला दाखवली होती. सुशांतच्या बहिणीने त्याला काही औषधे घ्यायला सांगितली. सुशांतची बहिण दिल्लीतील डॉक्टरांच्या मदतीने सुशांतला प्रतिबंधक औषधे देत होती, असं रियानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असा आरोप रियाने एफआयआरमध्ये केला आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायला हवी. बहिणीने सल्ला दिलाय म्हणून औषधे घेऊ नकोस कारण तिच्याकडे मेडिकल डिग्री नाही, असंही रियानं यावेळी सुशांतला बजावलं होतं.

प्रियंका आणि मीतू यांनी ही तक्रार रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र हा गु.न्हा रद्द करण्यास मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात मुंबई पोलीसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे प्रतिज्ञापत्र पोलीस स्टेशन स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांनी दाखल केले आहे.

या प्रतिज्ञापत्रात प्रियंका सिंह, मीतू सिंह आणि डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधातील गु.न्हा रद्द करू नये, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. सुशांतने आ.त्मह.त्या केली असल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्ट मत आहे.

दरम्यान, रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपविली होती. मात्र, सीबीआयनं बॉम्बे हायकोर्टात रियानं केलेले सर्व आरोप फेटाळले होते.

रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले आहेत ते सर्व आरोप काल्पनिक आहेत. तसेच रियानं कोणत्याही पुराव्याविना बिनबुडाचे आ.रोप केले आहेत, असं सीबीआयनं म्हटलं होतं. सीबीआयनं यावेळी मुंबई पोलिसांना देखील झापलं होतं.

मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याअगोदर तपास करायला हवा होता. एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाहीत. हे पाहता मुंबई पोलिसांनी रियाची तक्रार आम्हाला फॉरवर्ड करायला हवी होती, असंही सीबीआयनं कोर्टात म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! म्हणाले राज्यात पत्रकारितेला…

दिल्लीच्या संघाने केलेल्या ‘या’ चुकीमुळे कोलकत्ता टीम आयपीएल बाहेर गेली!

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याचा ऐन तारुण्यात मृ.त्यू

सारा अली खानची ‘ती’ गोष्ट सलमानला आवडली तेव्हा साराला मिठी मारत सलमानने…

अत्यंत धक्कादायक!!! अर्णब गोस्वामीला अ.टक करण्यामागचं खरं कारण आलं समोर!