आजपासून आयपीएलचा रणसंग्राम! पहिल्याच सामन्यात भिडणार भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू

चेन्नई| अखेर प्रतिक्षा संपली आहे. आजपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. आयपीएल 2021चा पहिला सामना सुरु होण्यासाठी काही तास उरले आहेत. स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या बड्या लढतीनं होणार आहे. भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची मेजवाणी ठरणार आहे.

कोरोनाचं सावट असलं तरी क्रिकेट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयपीएलचं 14 वं सीझन उद्यापासून सुरू होतंय. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना दोन जबरदस्त संघांमध्ये होतोय. एका बाजूला आहे आयपीएलच्या जेतेपदावर सर्वाधिक वेळा अधिराज्य गाजवलेला मुंबई इंडियन्सचा संघ तर दुसरीकडे मातब्बर आणि धडाकेबाज खेळाडूंचा भरणा असलेला कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ

आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही कॅप्टन्सच्या टीम पहिल्या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहेत. या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी दोन्ही टीमनं योग्य अंतिम 11 खेळाडू मैदानात उतरवणे आवश्यक आहे.

एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. उभय संघात एकाहून एक जबरदस्त खेळाडूंची भरमार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार हे निश्चित आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विराट कोहली, एबी डीविलीर्स, युझवेन्द्र चहल असे स्पेशालिस्ट खेळाडू असून देखील आरसीबीचा खेळ म्हणावा तसा चांगला झाला नाही. परंतु यंदा ग्लेन मॅक्सवेल च्या रूपाने आक्रमक फलंदाज आणि काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असल्याने आरसीबीचा संघ थोडा तगडा वाटतो. पण बलाढ्य मुंबई विरुध्दचा सामना नक्कीच त्यांच्यासाठी सोप्पा नसेल.

रोहित शर्माची मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात बलाढय टीम असून आत्तापर्यंत मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव कायरन पोलार्ड जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या सारखे मातब्बर खेळाडू असून मुंबईचा संघ तगडा आहे. कर्णधार रोहित शर्मा चे कल्पक नेतृत्व मुंबईसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

मुंबईच्या संघाकडून, रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, पियूष चावला आणि जिम्मी नीशम हे संभावित प्लेइंग इलेव्हन असणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कायल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी आणि रजत पाटीदार हे संभावित प्लेइंग इलेव्हन असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ गावात कपडे न घालण्याची अनोखी पंरपरा,…

IPL 2021: पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीचा चाहत्यांना खास…

काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली…

मुव्ही माफियांच्या भितीनं ‘या’ अभिनेत्यानं केला…

‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची…