सावधान! कोरोनाची लक्षणं असतानाही ‘या’ कारणांमुळे तुमचा रिपोर्ट येऊ शकतो निगेटिव्ह

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे.

तर दुसरीकडे काही रूग्णांची टेस्ट केल्याचे रिपोर्ट भिन्न येत आहेत. म्हणजेच काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. परंतू टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर आज आम्ही तुम्हाला रिपोर्ट निगेटिव्ह कसा येतो या मागिल कारणं सांगणार आहोत.

स्वॅब घेण्याची चुकीची पद्धत- रूग्णांच्या नाकातून किंवा घशातून एखादा स्वॅब घेतल्यानंतर ते द्रवपदार्थात ठेवले जाते. नंतर ते त्या पदार्थात मिसळते आणि त्यात सक्रिय राहते. त्यानंतर त्याला चाचण्यांसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाते. परंतु जर स्वॅब घेताना एखादी चूक झाली असेल तर रिपोर्ट निगेटीव्ह येण्याची शक्यता असते.

तज्ञांच्या मते स्वॅबचा नमुना योग्य प्रकारे पाठवला गेला नाही तर अहवाल नकारात्मक होण्याची शक्यता जास्त असते. ट्रांसपोर्टेशनदरम्यान व्हायरस सामान्य तापमानाच्या संपर्कात येतो. त्यावेळी आपले वाइटॅलिटी गमावतो. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह येतो.

द्रव पदार्थांचा अभाव- रुग्णाच्या घशातून किंवा नाकातून स्वॅबचा नमुना घेतल्यानंतर कोरोना चाचणी रिपोर्ट येईपर्यंत, व्हायरस सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात द्रवपदार्थ कमी झाला तर रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.

म्यूटेंट स्ट्रेन- कोरोना डबल म्युटंट व्हायरस जगातील अनेक भागामध्ये पसरला आहे. यावर तज्ञांचे म्हणणे आहे की, शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा ही डबल म्यूटेशन ओळखण्यास असमर्थ आहे, म्हणूनच आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट कधी- कधी निगेटिव्ह येऊ शकतो.

त्यामुळे जरी आपल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल. परंतू तुमच्यात कोरोनाची लक्षणे दिसतं असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करायला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात आहाराबाबत घ्या ‘ही’ काळजी

जाणून घ्या! ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं…

पतीच्या निधनानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दुसऱ्या लग्नाविषयी…

कोल्हापूरात प्रवाशांवरून रिक्षा चालकांची तूफान हाणामारी,…

भुकेलेल्या सिंहाने पर्यटकांच्या गाडीवर घेतली झेप अन्…,…