सावधान! पुढील 3 दिवस राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

मुंबई | मागील पावसाळ्यात अनेक नद्यांना पूर आल्याचं पहायला मिळालं होतं. राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. तर हिवाळ्यात देखील थंडीचं प्रमाण वाढलं होतं.

अशातच आता राज्यातील थंडी गायब झाल्याचं दिसत आहे. उन्हाळा वाढत असल्यानं आता अंगाची लाहीलाही झाल्याचं दिसतंय.

वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोवा आणि मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मध्ये देखील 14, 15 आणि 16 तारखेला उष्णतेची लाट येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

येत्या 14 तारखेला उष्णतेचं प्रमाण अधिक असल्याचं देखील हवामान खात्याने सांगितलंय. तर 15 आणि 16 तारखेला प्रमाण कमी असेल.

येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39 अंश सेल्सियस राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उष्णतेची लाट जरी काही प्रमाणात जास्त असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

पुरुषांच्या ‘या’ सवयींमुळे महिला जातात त्यांच्यापासून कायमच्या लांब!

चीन आणि युरोपमधून कोरोनासंदर्भात अत्यंत चिंताजनक बातमी समोर! 

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण