7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; खात्यात येणार तब्बल 2 लाख रूपये

नवी दिल्ली |  केंद्र सरकार सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन आपल्या प्रक्रियेमध्ये त्यांना समावून घेण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या अगोदर खुशखबरी (7th Pay Commission) मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची थकबाकी डीएची प्रतिक्षा आता लांबत चालली आहे. 18 महिन्यांची थकबाकी डीए 2022 मध्ये भरली जाईल की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. अशात डीएच्या थकबाकीबाबत मोदी सरकारने मोठी माहिती दिली आहे.

केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून डीए थकबाकीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार कर्मचाऱ्यांच्या डीए (महागाई भत्ता) चे वन टाइम सेटलमेंट करेल, म्हणजेच सुमारे 18 महिन्यांची थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती आहे.

केंद्र सरकार 16 तारखेला होणाऱ्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुळ पगारात वाढ आणि फिटमेंट फॅक्टरवर देखील सरकार विचार करणार आहे.

या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या लटकलेल्या डीए थकबाकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांंपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सर्वोत्तम सुविधांवर भाष्य केलं होतं.

18 महिन्यांचा प्रलंबित डीए भरल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम येऊ शकते. लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रुपये 11,880 ते 37,000 रुपये असेल.

दरम्यान,  स्तर-13 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये डीए थकबाकी म्हणून मिळतील. सरकारी कर्मचारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी ते दिले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुरुषांच्या ‘या’ सवयींमुळे महिला जातात त्यांच्यापासून कायमच्या लांब!

चीन आणि युरोपमधून कोरोनासंदर्भात अत्यंत चिंताजनक बातमी समोर! 

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण