राजधानी काबीज करण्यासाठी भाजपची टीम दिल्लीदरबारी

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दिल्ली भाजपने काबीज करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पक्षाच्या अध्यक्षांपासून सर्व यंत्रणांना कामाला जुंपलंय.भाजपचे महाराष्ट्रातले अनेक नेते दिल्ली विधानसभेसाठी प्रचार करत आहे. आता महाराष्ट्रातली दुसरी टीम दिल्लीत दाखल झाली आहे.

औरंगाबादमधून शहराध्यांपासून ते सर्व पदाधिकारी प्रचारासाठी दिल्लीला गेले आहेत. औरंगाबादच्या या टीमला दिल्लीतील तिमारपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही टीम दारोदारी जाऊन प्रचार करत आहे.

भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांची टीम प्रत्येक मतदारसंघात काम करताना पाहायला मिळतेय. तिमारपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह बिट्टू यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे गेले होते. तर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत प्रचारासाठी गेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“… तर मुंबईत फिरणं अशक्य होईल”

-“जीएसटीची भरपाई रक्कम दोन टप्यात सर्व राज्यांना देणार”

-“पवार साहेबांनी सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला”

-केजरीवाल दहशतवादी असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

-‘इमोशन क्वीन’ मानसी नाईकला मिळाला लाईफ पार्टनर; दिली प्रेमाची कबुली