इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!

बीड | पुत्रप्रातीसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिल्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अडचणीत आले आहेत. NCPNDT या कायद्यांतर्गत त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे तर अंनिसच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता महाराजांचे पाठीराखे आणि टीकाकार एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशातच इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बीडच्या तांदळवाडीतले महादेव मंदिरातले भगवान महाराज यांनी बाभळीच्या काट्यावर साधना सुरू केली आहे.

बीडपासून तांदळवाडी हे गाव 25 किमी अंतरावर आहे. या गावात महादेवाचं मंदिर आहे. याच महादेवाच्या मंदिरात भगवान महाराज तपासाठी आले आहेत. 12 वर्ष तप करण्यासाठी ते या गावात आले आहेत, अशी माहिती आहे. महाराजांचं वक्तव्य अजिबात चुकीचं नाही त्यांच्यावर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं भगवान महाराज म्हणाले आहेत.

यंदाच्या वर्षी राज्यात तसंच मराठवाड्यात बक्कळ पाऊस पडू दे यासाठी त्यांनी स्वत:ला झाडाला टांगून घेतलं होतं. त्यांच्या या साधनेची देखील संपूर्ण बीडमध्ये चर्चा होती. आता इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देण्यासाठी ते चक्क बाभळीच्या काट्यावर झोपले आहेत.

भगवान महाराज यांचं मूळ गाव लिंबारुई आहे. त्यांचा बारा वर्षाचा तप आहे. पाठीमागच्या दोन वर्षापासून तांदळवाडीमधल्या संगमेश्वर संस्थानात ते रहायला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

नकळत बोलून गेले असतील… त्याचं इतकं काय भांडवल करता?- सिंधुताई सपकाळ

-“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होणार”

-दाणादाण उडालेल्या दिल्ली काँग्रेसची धुरा आता ‘या’ महिल्या नेत्यावर?

-“फक्त महाराजांनी नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील माफी मागितली पाहिजे”

-इंदोरीकरांना वाचवणाऱ्या राजकीय नेत्यांना तुम्हाला मंत्रालयात कोंडून घेईन- तृप्ती देसाई