अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

नवी दिल्ली| भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो. सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

सध्या अक्षय तृतीयाही येणार आहे. या मुहुर्तावर सोन्याची खरेदी करणं शुभ मानलं जातं. अशातच जे सोन्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किंमत 0.18 टक्केने कमी होऊन  47,548 प्रति तोळा झाली आहे.

तर चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर 0.60% ने घसरून 71,500 रुपये प्रति किलो झाले आहेत.

जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,832 डॉलर तर चांदीचा दर 27.38 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर वधारत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

भारतात बहुतांश सोने आयात केले जात असल्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर होतो.

सोन्याचे दर आजही रेकॉर्ड स्तरावरून खूप कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्या स्तरावरून सोन्याचे दर साधारण 9000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर अमेरिकन रोख्यावरील परतावा वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाले. भारतातही या घडामोडीचा परिणाम होऊन सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.

महत्वाच्या बातम्या – 

‘कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होतो’…

अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आजीनं उघडले डोळे…

“कोरोना वाईट, खूप वाईट, प्लिज दुर्लक्ष करु नका”…

जाणून घ्या! प्रेग्न्सीत कोरोनाप्रतिबंधक लस घेणं किती…

लॉकडाऊनमध्ये हिंडणाऱ्या दोन तरूणांवर पोलिसांनी केली अनोखी…