आत्महत्येपूर्वी सुशांत सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी; मुंबई पोलिसांचा नवा खुलासा

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांवर आरोप लावण्यात आले आहेत. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा केला आहे. सुशांत आत्महत्येपूर्वी सतत तीन गोष्टी सर्च करत असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने आत्महत्येदिवशी म्हणजेच 14 जून रोजी गूगलवर आपले नाव सर्च केले होते. त्याबरोबरच सुशांत आत्महत्येच्या एक आठवडा अगोदर सतत आपलं नाव, त्याची मॅनेजर दिशा सालीयनच नाव आणि आपल्या आजाराबाबत सर्च करत होता.

ही माहिती सुशांतच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवडा अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सालीयनने आत्महत्या केली होती.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तरीही सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी बिहार पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. बिहार पोलीस सध्या याबाबत नव्याने तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!

नव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात

“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”

“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामायणातील मंथरेसारखे; हनुमान गढी महंतांची टीका