संतापजनक! तब्बल 10 शिक्षकांनी केला 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार

अलवर | राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील नारायणपूर परिसर एका सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं आहे. शाळेत शिकवणाऱ्या दहा शिक्षकांनी मिळून शाळेतीलच सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलीचे वडील दाखला आणण्यासाठी शाळेत गेले होते. मात्र शिक्षकांनी दाखला दिला नाही. 20 जुलै रोजी तीन शिक्षक पीडित मुलीचे घरी आले आणि त्यांनी मुलीला शाळेत येऊन दाखला घेऊन जाण्यास सांगितले. पण शिक्षक घरी आलेले पाहिल्यानंतर पीडित मुलगी मोठमोठ्याने रडू लागली.

मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी मुलीला कारण विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालक मुलीला घेवून नारायणपूर पोलीस स्टेशनमध्ये गेले व 10 शिक्षकांसह शाळेच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत पोक्सो कायद्या अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. सहपोलिस अधिक्षक शैलेंद्र इदोलीया हे सध्या या घटनेचा तपास करत आहेत. त्याबरोबरच, घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी पीडितेची भेट घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन

खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!

नव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात

“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”

“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”