“सुशांतच्या मृत्युपूर्वी रियाच्या कुटुंबाकडून सुशांतवर तीन महिने जादूटोणा चालु होता”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपविला आहे. सीबीआयनं याप्रकरणी आपला तपास सुरु केला आहे. सुशांतप्रकरणी सीबीआय अत्यंत वेगाने तपास करत असून याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांतचे अनेक चाहते सोशल मीडियावर रियाला मोठ्या प्रमाणत ट्रोल करत आहेत. सुशांतचे अनेक चाहते रियाच्या अटकेची मागणी करत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून सुशांतचे चाहते रियाबद्दल आपला संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता सुशांतच्या काही चाहत्यांनी रियाच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

रिया ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये सुशांतच्या दोन महिला चाहत्या आज गेल्या होत्या. या दोघींनी सुशांतच्या सोसायटीमध्ये मोठा गोंधळ उडवून दिला आहे. या दोघींनी रियाच्या आईने सुशांतवर काळी जादू केली होती, असा आरोप केला आहे.

या दोन्ही महिला खारच्या राहणाऱ्या आहेत. या महिलांनी आरोप केला आहे की, रियाची आई सुशांतवर पांढऱ्या पावडरचा वापर करत होती. रियाची आई जवळपास तीन महिने सुशांतवर काळी जादू करत होती. या महिलांना ही माहिती रियाची मोलकरीण आणि शेजाऱ्यांकडून समजली आहे, असं या दोन महिलांनी सांगितलं आहे.

या महिलांनी रियाच्या सोसायटीमध्ये मोठा गोंधळ उडवून दिला होता. यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोन महिलांना बाहेर काढलं. दोन महिलांनी केलेल्या या आरोपानंतर सुशांतचे चाहते रियाच्या कुटुंबावर आणखीनच संतापले आहेत.

महिलांनी केलेल्या या गोंधळानंतर रियानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलला आहे. या व्हिडीओमध्ये रियाच्या वडिलांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला आहे. आम्ही घराबाहेर पडून तपासयंत्रणांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र बाहेर आमच्या जीवाला धोका आहे, असं कॅप्शन रियानं या व्हिडीओसोबत दिला आहे.

दरम्यान, रियाच्या व्हाट्सअ‌‌‌‌ॅप चॅटमधून ड्रग्ज संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रियावर ड्रगचं सेवन केल्याचा आणि व्यापार केल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riya chakravarti🔵 (@riya__chakravati_) on

महत्वाच्या बातम्या-

‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’; सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे गरजले

महाडनंतर आता मुंबईतील नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची शक्यता

काय सांगता! आलं केसांसाठी वरदान ठरू शकतं?; वाचा सविस्तर