Panjab New CM | भगवंत मान बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली | आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्यापंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते.

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानलेत.

भगत सिंग जी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पक्ष लढत आहे. तसेच चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारेल. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू, असं मान म्हणालेत.

शपथविधीपूर्वी भगवंत मान यांनी एक ट्विट केले होते. सूर्याच्या सोनेरी किरणाने आज नवी पहाट आणली आहे. शहीद भगत सिंग आणि बाबा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकर कलान येथे शपथ घेणार आहे. शहीद भगत सिंगजींच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलानकडे रवाना होत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान,पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल नुकतेच काही दिवसांपूर्वी लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे.

पंजाबमध्ये आपचे तब्बल 92 आमदार निवडून आले आहेत. पंजाबच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाला एवढे बहुमत मिळाले.

अखेर आज आपचे भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर काँग्रेस भाजपला 2024 मध्ये तगडं आव्हान देऊ शकतं”

 “नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…”

Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर 

चंद्रकांत पाटलांचा नवा खळबळजनक दावा; राजकारणात मोठी उलथापालथ होणार? 

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा…