भाडेकरूंना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निकाल

नवी दिल्ली | मोठ्या शहरांपासून ते गावांपर्यंत सध्या सर्वात मोठा विषय म्हणून घरभाड्याची चर्चा आहे. वाढत्या गरजा आणि विविध कारणांनी घर भाड्यानं घेण्याची पद्धत आहे.

घर भाड्यानं घेऊन राहायला लागल्यावर अनेकदा राहाणारी व्यक्ती आणि घरमालकामध्ये विविध कारणांवरून वाद होतात. घरभाडे हा वादाचा सर्वात मोठा विषय असतो.

घरभाडे भरण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. भाडे न भरणे हा भारतीय दंडसंहितेनूसार गुन्हा नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातील करोडो भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे. संबंधित घरमालकानं भाडेकरू विरोधात एफआरआय दाखल केला होता.

संबंधित प्रकरणात भादंवि कलम 415 अन्वये फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासाठी आणि कलम 403 अंतर्गत गैरवापर केल्याच्या गुन्हासाठी एफआरआय दाखल होते.

एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर निकाल देताना इलाहाबाद उच्च न्यायालयानं घरमालकाला दिलासा दिला होता. परिणामी भाडेकरू कुटुंबानं सर्वोच्च न्यायालयाच धाव घेतली होती.

भाडेकरूनं जर कोणत्या कारणामुळं भाडे भरण्यास नकार दिला तर तो गुन्हा ठरत नाही. याप्रकरणात भादंवि अतंर्गत कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

सदरिल निकाल हा नितू सिंग विरूद्ध उत्तर प्रदेश सरकार प्रकरणाशी संबंधित आहे. भाडे न भरल्यास कायेदशीर कारवाई केली जाऊ शकते पण गुन्हा नोंदवला जाणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं इलाहाबाद उच्च न्यायालायचा निकाल रद्दबातल ठरवला आहे. परिणामी याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 दिशा सालियान प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय!

“नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…” 

Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर 

चंद्रकांत पाटलांचा नवा खळबळजनक दावा; राजकारणात मोठी उलथापालथ होणार? 

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा…