भास्कर जाधवांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी गॅसवर! पक्षप्रवेशाचं आणि दबावाचं नवं तंत्र???

मुंबई |  होय, मी उद्धव ठाकरेंना भेटलो आहे आणि लवकरच कार्यकर्त्यांशी बोलून मी पुढचा राजकीय निर्णय घेणार आहे, असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांच्या नव्या वक्तव्याने राष्ट्रवादी गॅसवर राहणार आहे. मी इथून पुढची कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या मुलासाठी मी विधानसभेचं तिकीट राष्ट्रवादीकडे मागितलं असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे.

भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर खुलासे केले. मात्र भास्कर जाधवांची मुलाला तिकीट मागण्याची मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून जाधव करत आहेत, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

2004 साली शिवसेना का सोडली याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. आमच्या भेटीत मनमोकळ्या गप्पा झाल्या. एकमेकांबाबत असलेला समज-गैरसमज या भेटीतून दूर झाला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, जाधवांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जाधवांच्या मुलाला राष्ट्रवादी तिकीट देणार का? आणि राष्ट्रवादीने तिकीट नाही दिलं तर जाधव राष्ट्रवादीत थांबणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-