“सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा”

मुंबई | राज्याच्या राजकारणात आपल्या दिलखुलास बोलण्यानं सर्वांना घायाळ करणारे भाजप नेते रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं चर्चेत आले आहेत.

रावसाहेब दानवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपल्याला एक ब्राम्हण नेता बसलेला पाहायचा आहे, असं वक्तव्य केलं होत. त्यानंतर आता या वक्तव्यावरून दानवेंना टीकेचा सामना देखील करावा लागत आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दानवेंना चांगलंच फैलावर घेतलं आहे. दानवेंवर टीका करताना भुजबळांनी मुख्यमंत्री कसा असावा याबद्दल सांगितलं आहे.

मुख्यमंत्री ब्राम्हण असावा की इतर हे बहुमतावर ठरतं. मात्र सर्वांना बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री असावा, सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.

भुजबळांचा टोला आता नेमका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना होता, हीच चर्चा राज्यात रंगली आहे.

मुख्यमंत्री ब्राम्हण, मराठा, दलीत, ओबीसी कुणाचा असेल हे बहुमतावर ठरेल मात्र यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या रोड मॅपवर चालणारा मुख्यमंत्री असावा, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

पुरोगामी राज्य आहे, राज्यातील वैचारिक परंपरा आहेत. त्या परंपरेवर चालणारा मुख्यमंत्री राज्याला हवा आहे, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा

 “आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले

सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ

 मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास