‘या’ अभिनेत्रीच्या आजीचा स्वॅग पाहून नेटकरी म्हणाले ‘लय भारी’; पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवू्ड मधील अनेक कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून  चाहत्यांच्या संपर्कात असतात. बहुतेक कलाकार सोशल मिडीयावरून आपल्या आयुष्यातील अनमोल आनंदाचे क्षण चाहत्यांबर शेअर करतात. बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा देखील सतत सोशल मिडीयावच्या माध्यमातून चाहत्यांबर काही न काही शेअर करत असते.

अदा शर्मा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. अदा शर्मा सोशल मिडीयावर शेअर करत असलेले फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अदाची खास अदा नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. अशातच आता सोशल मिडीयावर अदा शर्माचा आणखी एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

अदाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा आपल्या आजीसोबत ड्रंक अॅंड हाय डान्स करताना दिसत आहे. अदाने इंस्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांतच तूफान व्हायरल झाला आहे.

अवघ्या काही तासांमध्ये अदाचा हा व्हिडिओ 93 लाख लोकांनी पाहिला आहे. नेटकरी अदाच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स करत आहेत. अदाची आजी या व्हिडिओमध्ये साडीवर डान्स करताना दिसत आहे. अदाच्या आजीचा स्वॅग पाहून नेटकरी तिच्या आजीला चांगलंच नावजत आहेत.

नुकतंच काही दिवसांपूर्वी अदाचा ड्रंक अॅंड हाय हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे रॅप सॉन्ग सध्या तरुणांमध्ये विषेश चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अदाने आणि तिच्या आजीने काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. दोघीही या गाण्यावर फुल एन्जॉय करत आहेत.

दरम्यान, अदाने 2008 मध्ये बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘1920’ हा अदाचा पहिला चित्रपट आहे.  यानंतर अदा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकली आहे. फिर, हम है राही कार के, कल्की यांरख्या चित्रपटांमधून अदा रूपेरी पडद्यावर झळकली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या बदाम खाण्याचे ‘हे आरोग्यदायी फायदेे

खडसेंविरोधात ईडीची का.रवाई! पुन्हा समन्सची नोटीस बजावून अ.टक करणार?

चालू मिटींगमध्ये बायको झाली आऊट ऑफ कंट्रोल नवऱ्याला केलं किस अन् मग…; पहा व्हिडीओ

जल्लोष नडला ! गजानन मारणेला जेल मधून सुटल्यानंतरही दिले चौकशीचे आदेश

‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धिसाठी केला’ ‘या’ फोटोंमुळे अंकिता सोशल मीडियावर होतेय ट्रोल