आनंदाची बातमी! 7,199 रुपयांचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 599 रुपयात, जाणून घ्या भन्नाट ऑफर

आजकाल नवीन मोबाईल फोन घेण्याची क्रेझ वाढली आहे. आपल्याकडे चांगला मोबाईल असावा असं सगळ्यांना वाटत असतं. जर तुम्हाला जास्त बॅटरीचा, स्वस्त स्मार्टफोन हवाय तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. स्मार्टफोन Infinix Smart 5ची विक्री आजपासून म्हणजे 18 फेब्रुवारी पासून सुरु हाणार आहे. हा स्मार्टफोन मागच्या आठवड्यातच लाॅन्च केला गेला आहे. हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

इन्फिटिक्स या कंपनीने त्यांचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 5 चा पहिला सेल आज आयोजित केला आहे. या फोनची किंमत केवळ 7,199 रुपये इतकी आहे. पहिल्या ऑफरमध्ये या स्मार्टफोनवर कंपनीने डिस्काऊंट दिले आहेत. त्याचबरोबर कॅशबॅक ऑफर्स देखील दिल्या आहेत.

Infinix Smart 5 मध्ये विशेष गोष्ट म्हणजे 6000mAh ची बॅटरी आहे. Infinix Smart 5 हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही येस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरु शकता. या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही EMI वर हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 7 टक्क्यांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कराल तर तुम्हाला 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल.

Infinix smart 5 ऑफरमध्ये ग्राहक या फोनवर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 6,600 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट भेटेल. Infinix Smart 5 हा स्मार्टफोन ग्राहक अवघ्या 599 रुपयांमध्येदेखील खरेदी करु शकतात.

Infinix smart 5 या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz चा प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 3 जीबी रॅमसह येतो. या फोनच्या कॅमेराविषयी बोलायचे झाल्यास या फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर दोन QVGA सेंसर्सही देण्यात आले आहेत. सेल्फी घण्यसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनच्या ग्लोबल वेरिएंटबाबत बोलायचे झाल्यास हा फोन अँड्रॉयड 10 गो एडिशनवर बेस्ड असेल, जो XOS 6 सह येतो. Infinix smart 5 या फोनचं भारतीय वेरिएंट थोडं वेगळं असू शकतं. या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 6.82 इंचांचा HD+ डिस्प्ले दिला जाईल, जो की नॉच सेल्फी कॅमेरासह येतो.

Infinix smart 5 या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस, ब्लुटूथ, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 स्टोरेज देण्यात आलं आहे. याची स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडीकार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवू शकता.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या बदाम खाण्याचे ‘हे आरोग्यदायी फायदे

    गॅस सिलेंडरचा भ.डका! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

      खडसेंविरोधात ईडीची का.रवाई! पुन्हा समन्सची नोटीस बजावून अ.टक करणार?

        चालू मिटींगमध्ये बायको झाली आऊट ऑफ कंट्रोल नवऱ्याला केलं किस अन् मग…; पहा व्हिडीओ

          जल्लोष नडला ! गजानन मारणेला जेल मधून सुटल्यानंतरही दिले चौकशीचे आदेश