विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

मुंबई | राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पदभरतीचं वारं वाहत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेकपदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.

एमपीएससीनं सध्या राज्यसेवा, दुय्यम गट-क, गट-ब, या परीक्षेकरिता अर्ज मागवायला सुरूवात केली आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वी होणारी राज्यसेवा पुर्व परीक्षा ही वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळं पुढं ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता त्या परीक्षेकरिता महत्त्वाची सुचना आयोगानं प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

तसेच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आल्या आहेत. सोबत परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत.

एमपीएससी आयोगानं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्या परिपत्रकात सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा संभ्रम कमी झाला आहे.

आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा आता रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.

रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित परीक्षेकरीता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रांमध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

दरम्यान, राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानं राज्यातील विद्यार्थ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुढील परीक्षादेखील व्यवस्थितपणे घेण्याची आशा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

पाहा ट्विट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण

 ‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय