Top news

भाजपला सर्वात मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्यानं दिला राजीनामा

yogi aadinath

मुंबई | देशातील गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,  मणिपूर, पंजाब या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशात आता उत्तर प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मोर्य यांनी राजीनामा दिला आहे. परिणामी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हादरा मानला जात आहे.

स्वामी प्रसाद मोर्य यांना योगी सरकारमधील एक दिग्गज मंत्री म्हणून ओळखलं जातं. परिणामी त्यांच्या राजीनाम्यानं भाजपमधील अंतर्गत कलह आता समोर आला आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं तब्बल 300 हून अधिक जागा मिळवत उत्तर प्रदेशात एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. अशावेळी भाजपसमोर पुन्हा सत्ता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये स्वामी प्रसाद मोर्य यांच्याकडं महत्त्वाच्या खात्यांचा कारभार होता. त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केल्याचं मोर्य यांनी म्हटलं आहे.

स्वामी प्रसाद मोर्य यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना आपला राजीनामा पाठवला आहे. राज्यातील दलित, युवा, शेतकरी, महिला यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करता येत नसल्यानं मी राजीनामा देत असल्याचं  मोर्य यांनी म्हटलं आहे.

स्वामी प्रसाद मोर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निश्चय केल्याचं सध्या बोललं जात आहे. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोर्य यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वामी प्रसाद मोर्य यांनी आतापर्यंत पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. यापुर्वी ते बसपचे प्रदेशाध्यक्ष राहीले आहेत. त्यांची मुलगी बदायूं लोकसभा मतदारसंघातून भाजपची खासदार आहे.

दरम्यान, स्वामी प्रसाद मोर्य यांच्या राजीनाम्यानं सध्या अजून काही नाराज आमदार आणि मंत्र्यांनी पक्ष सोडण्याची तयारी चालू केल्याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल