‘आमची मोठी चूक झाली’; एसटी कामगार संघटनेने गुणरत्न सदावर्तेंची केली हकालपट्टी

मुंबई | एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कामगार कृती संघटनेने गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली.

आम्ही आता नव्या वकिलाची नेमणूक केलेली आहे. पुढील सुनावणीला नवीन वकील न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी दिली.

एसटी विलीनीकरणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमच्यातर्फे आम्ही गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आम्ही त्यांना पत्र देत त्यांची नेमणूक मागे घेतल्याचं सांगितलं आहे, अशी माहितीही अजयकुमार गुजर यांनी दिली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेली आहे ती आता वाचणार आहे, असंही कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी म्हटलं आहे.

एसटी टिकवण्याची जबाबदारी सर्व कर्मचार्‍यांची आहे, एसटी टिकेल तर आपण टिकू, असं सुनील निरभवणे यांनी म्हटलं. तसेच सदावर्ते यांची नेमणूक करून फार मोठी चूक झाली, अशी कबुली देखील गुजर यांनी दिली. आहे.

वकिल सदावर्तेंची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल 

सर्वात मोठी बातमी- ‘वोडाफोन आयडिया’वर सरकारची मालकी