भाजपला मोठा धक्का! आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

लखनऊ | देशाच्या केंद्रीय सत्तेचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो असं राजकीय जाणकार सांगतात. सध्या उत्तर प्रदेशात भाजपची एकहाती सत्ता आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण भाजपला अंतर्गत बंडाळीला सामोरं जावं लागत आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकांची तयारी चाललेली असताना उत्तर प्रदेशात मात्र मोठी राजकीय खळबळ माजली आहे.

तब्बल 300 हून अधिक जागा मिळवत गतवेळी 2017 ला सत्ता स्थापन करणारी भाजप आता आपल्याच जाळ्यात अडकत चालली आहे. पक्षाला रामराम ठोकणाऱ्या आमदारांची आणि नेत्यांची नावं आता समोर येत आहेत.

दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशात भाजपला मोठी गळती लागली आहे. योगी सरकारमधील दिग्गज मंत्री स्वामी प्रसाद मोर्य यांच्यानंतर आता वनमंत्री दारा सिंह चौहान यांनी देखील आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दारा सिंह मऊ जिल्ह्यातील मधुबन विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. योगी सरकारमधील कार्यक्षम मंत्री म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

स्वामी प्रसाद मोर्य यांनी जी कारण दिली होती राजीनामा देताना अगदी तशीच कारणं दारा सिंह यांनी दिली आहेत. दारा सिंह यांच्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ काही आमदारांचे राजीनामे येण्याची शक्यता आहे.

दारा सिंह यांनी याअगोदरही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये काम केलं आहे. दोन वेळा आमदार आणि एकवेळा राज्यसभा खासदार अशी दारा सिंह यांची राजकीय काराकीर्द आहे.

दरम्यान, दररोज आमदार आणि नेते सोडून जात असल्यानं उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह सध्या चर्चेत आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं