भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंना मोठा झटका!

उस्मानाबाद | भाविकांना मंदिरात सांयकाळी 6 नंतर प्रवेश असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले होते. मात्र पास न काढताच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतलं.

सगळे भाविक प्रवेश द्वारावर दर्शनाच्या प्रतिक्षेत असताना तुषार भोसले सहकुटुंब मंदिरात अशी स्तिथी होती. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात भोसले यांनी विनामास्क फोटो सेशनही केलं. मात्र त्यांना साधं कुणी हटकलंही नसल्याचं पाहायला मिळालं.

बुकिंगनंतरच सायंकाळी 6 नंतर भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसा नियम खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी केला असूनही मंदिरात प्रवेश देताना तुषार भोसले यांना वेगळा न्याय देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

भाजप अध्यात्मिक आघडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

नियम सर्वांना सारखे आहेत. नियमभंग केला असेल तर कारवाई केली जाईल, असे सांगत कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. भक्तांना सायंकाळी 6 नंतर तुळजाभवानी मंदिरात प्रवेश असताना भोसले यांना मंदिरात नियमबाह्य प्रवेश दिला गेला.

भोसले यांनी विना पास प्रवेश करून मंदिर गाभाऱ्यात सहकुटुंब आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसह फोटोसेशनही केलं आहे. यावेळी त्यांनी मास्क घातला नसल्याचं पाहयला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या-

दारातच मेहुण्यांनी आडवलं बारात घेऊन आलेल्या नवरदेवाला अन्…, पाहा अनोखा व्हिडीओ

‘तु माझ्यासाठी सगळं काही आहेस’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा रोमॅँटिक फोटो

अभिनेत्री गहना वसिष्ठच्या ‘या’ बोल्ड फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ‘इतका’ बोनस

काय सांगता! मुंगूस सोडून साप ‘या’ प्राण्यासमोरही पडतो गार, पाहा व्हिडीओ