भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचाही समावेश आहे.

या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांचा पुन्हा एकदा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरुण गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही.

मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मनोहरलाल खट्टर, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंग चौहान, प्रेमा खंडू, एन बिरेन सिंग, जय राम ठाकूर, प्रमोद सावंत यांच्यासह इतरांचाही समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंना मोठा झटका!

दारातच मेहुण्यांनी आडवलं बारात घेऊन आलेल्या नवरदेवाला अन्…, पाहा अनोखा व्हिडीओ

‘तु माझ्यासाठी सगळं काही आहेस’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा रोमॅँटिक फोटो

अभिनेत्री गहना वसिष्ठच्या ‘या’ बोल्ड फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ‘इतका’ बोनस