Top news कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

पतंजलीला मोठा झटका! ‘या’ औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही

मुंबई | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे कित्येक महिने बंद होते. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती.

भारतात देखील कोरोनामुळे लाखो लोकांचे ब.ळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतात सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना भारतात वेगाने हातपाय पसरु लागला आहे.

भारतात कोरोनावरील लसीकरण सुरु देखील झालं आहे. मात्र, अशातच आता बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ या आयुर्वेदिक कंपनीनं पुन्हा एकदा कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे.

नविन शोधलेल्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. तसेच आयुष मंत्रालयाने देखील कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. या टॅबलॅटमुळे 70 टक्के रुग्ण 3 दिवसांत बरे होतात, असा दावा पतंजली कंपनीने केला आहे.

मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनील विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे आता योग्य प्रमाणिकरण मिळाल्याशिवाय कोरोनील विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

याविषयी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी कोरोनील हे औषध बाजारात आणलं आहे. केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने देखील हे औषध परिणामकारक असल्याचा दावा फेटाळला आहे.

घाईघाईने हे औषध बाजारात आणणे चुकीचे आहे. केंद्रिय मंत्र्यांनी देखील याला समर्थन देणे योग्य नाही. पतंजलीच्या योग्य प्रमाणिकरणाची पूर्तता झाल्याशिवाय या औषधास महाराष्ट्रात विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. तसेच नागरिकांनी देखील यासंबंधीत जाहिरातींना बळी पडू नका, असं आवाहान देखील अनिल देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, पतंजली कंपणीच्या कोरोनील औषधाच्या लॉंचिंग कार्यक्रमला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! 15 मेपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येणार नाहीत?

तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा