मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सकाळी साडेसहाच्या सुमारास सक्तवसुली संचनालयानं चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात मालमत्ता व्यवहार झाल्याचा ठपका ईडीनं मलिक यांच्यावर ठेवला आहे. मनी लाॅड्रिंग प्रकरणातही मलिक यांचा सहभाग असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दाऊदची बहिण हसिना पारकर ही दाऊदच्या मुंबईतील सर्व गैरव्यवहाराचा मुख्य चेहरा आहे. मलिक आणि हसीना पारकर यांच्यात मालमत्तेचा व्यवहार झाल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं आहे.

मलिक यांनी तब्बल 30 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुद्दाम गोवण्यात आलं आहे. केंद्र सरकारविरोधात सातत्यानं टीका करत असल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत.

सरकार वकील आणि ईडीच्या वकीलांकडून न्यायालयात जोरदार यु्क्तीवाद केला गेला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे प्रकरण महत्त्वाचं असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

अशातच आता नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आता निकाल दिला आहे.

त्याचबरोबर मलिक यांना नियमित औषधं बाळगण्याची मुभा देखील न्यायालयाने दिली आहे. मलिकांची ईडीची कोठडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानंतर सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय.

दरम्यान, मलिकांच्या अटकेनंतर आता राज्यात मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याने आता प्रकरण आणखी किती पेटणार याकडे सर्वाचंच लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक