लग्नानंतर नवऱ्यानं सेक्स करण्यास नकार दिला, बायकोनं केलं असं काही की…

अहमदाबाद | पती-पत्नीमध्ये वैवाहिक आयुष्यात लग्नानंतर वाद विवाद झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. लग्नानंतर शारिरीक संबंध ही पती- पत्नीच्या वैवाहिक जीवनातील महत्वाची गोष्ट असते.

पती-पत्नीमधील वाद हे अनेकदा पोलिस स्टेशनपासून ते न्यायालयाच्या दारापर्यंत पोहचतात. अशातच पती-पत्नीच्या लग्नानंतरची एका घटनेची चर्चा विषय बनली आहे.

बडोद्यातील व्यक्तीसोबत एका महिलेनं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच सासरच्या लोकांनी महिलेला नातवंडाचं तोंड पहायची इच्छा बोलून दाखवली.

लग्नाच्या एक वर्षानंतरही तिच्यात आणि नवऱ्यामध्ये सेक्स झाला नाही. त्यामुळे, बायकोने शारिरीक संबंधाचा अधिकार मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

या 33 वर्षीय महिलेने साबरमती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. लग्नाच्या एक वर्षानंतरही तिच्यात आणि पतीमध्ये शारिरीक संबंध झाले नाही, असा आरोप महिलेनं लावला आहे.

शारिरीक संबंध ठेवण्यास पतीने नकार दिल्यानंतर महिला खूप वैतागली होती. पतीकडे अनेकदा मागणी करूनही अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या आणि त्रासही सहन करावा लागला. अखेर वैतागून महिलेनं पोलिसात पतीची तक्रार केली.

महिला जेव्हा पतीला शारिरीक संबंधाची मागणी करते तेव्हा तो म्हणतो मी तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही, असं म्हणतो. तर मुल आयव्हीएफच्या माध्यमातून पाहिजे, असा हट्ट देखील पतीने केलाय.

दरम्यान, या मुद्यावर जेव्हा पतीसोबत बोलते तेव्हा तो तिचा गळा दाबतो आणि त्रास देतो, असं महिलेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे. त्याचबरोबर आता सासरी पुन्हा बोलवून घेण्यासाठी 25 लाखांचा हुंडा देखील मागितल्याचं आरोप महिलेने केलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वांत मोठी बातमी! न्यायालयाचा मंत्री नवाब मलिकांना जोर का झटका

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…