‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई | लोकलमधून प्रवास करताना गर्दीचा सामना करावाच लागतो. आता न्यायालयाने लोकलने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय दिलाय.

रेल्वेत चढताना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेस रेल्वेत चढताना सहप्रवसाचा धक्का लागून दुखापत होते. तसेच अनेकांना यात जीवही गमवावा लागला आहे.

दुखापतग्रस्त प्रवाशाला रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या बाबतचा मोठा आणि महत्त्त्वाचा निर्णय दिला.

जर एखाद्या प्रवाशाने गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर प्रवाशांनी त्याला धक्का दिल्याने तो पडला आणि त्यामुळे दुखापत झाली, तर अशा व्यक्तीला रेल्वेविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्यास पात्र असेल असा आदेश हाय कोर्टने दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडल्यामुळे पायाला दुखापत झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीला 3 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश पश्चिम रेल्वेला दिलेत.

मुंबईत गर्दी खूप असल्याने प्रत्येक मुंबईकराला जोखीम घेऊन गर्दीत लोकल पकडावी लागते, असं निरीक्षण हे न्यायालयाने नोंदवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट

“मी प्रांजळपणे कबुल करते की…”, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

आत्ताची मोठी बातमी! तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर, सुटकेनंतर म्हणाले…