कमी खर्चात आरामात फिरा, 40 हजार रुपयांत तुम्ही करू शकता ‘या’ देशांची सफर

मुंबई | तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारताजवळील अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही अवघ्या 40 हजार रुपयांमध्ये चांगली फिरू शकता.

या देशांमध्ये तुम्ही केवळ समुद्र किनारा आणि नाईटलाइफचा आनंद घेऊ शकत नाही, तर तुम्ही जोरदार खरेदी देखील करू शकता.

हा आंतरराष्ट्रीय दौरा नक्कीच तुमचं मन जिंकेल. फक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, जसं की पैसे वाचवण्यासाठी, तुम्ही महागड्या हॉटेलऐवजी हॉस्टेलमध्ये राहू शकता.

महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याऐवजी रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास तुमची ही टूर 40 हजार रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते.

भूतान हा एक छोटासा देश आहे पण तो ऐतिहासिक स्थळे आणि पर्वतांवरून दिसणार्‍या नैसर्गिक दृश्यांसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

इतर देशांच्या तुलनेत सिंगापूर जरा महाग आहे पण तुम्ही इथे 40 हजार रुपयांमध्ये सहज फिरू शकता. अनेक सुंदर दृश्यांनी वेढलेले, सिंगापूर त्याच्या ट्रेंडी शॉपिंगसाठी जगभरात ओळखलं जातं.

उंच इमारतींसाठी प्रसिद्ध, दुबई त्याच्या लक्झरी लाइफसाठी जगभरात ओळखले जाते. मात्र, दुबईमध्ये तुम्ही अनेक साहसी गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

सुंदर असण्यासोबतच थायलंड हा एक अतिशय स्वस्त देश आहे. यामुळेच हे ठिकाण भारतीयांची पहिली पसंती राहते.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय 

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट

“मी प्रांजळपणे कबुल करते की…”, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य