मुंबई | राज्यासह देशभर महाराष्ट्राच्या गृहखात्यातील परमबीर सिंह प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनेक प्रकरण समोर आली होती.
परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या राज्यात अनेक पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं हा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेतला आहे.
परमबीर सिंह प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी यासाठी आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे.
सर्व प्रकरणांची माहिती एका आठवड्याच्या आत मुंबई पोलिसांनी सीबीआयला सोपवण्याचा आदेश देखील सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानं राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राज्य गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं प्रकरण आहे.
सध्यातरी परमबीर सिंह यांचं निलंबन काय राहाणार आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखीन एखादा एफआरआय दाखल झाला तर त्याचा तपास देखील सीबीआय करणार आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रूपये खंडीणीचा आरोप लावला होता. त्यानंतर सदरिल प्रकरण पहिल्यांदा बाहेर आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!