मुंबई | विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सची The Kashmir Files कमाई दुसऱ्या आठवड्यात हळूहळू कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
बुधवारी चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कोरोना महामारीनंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाच्या एकूण कमाईलाही द काश्मीर फाईल्सने मागे टाकलं आहे.
1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला.
विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या चित्रपटाच्या कमाईचा आकडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. 13 दिवसांत या चित्रपटाने 200.13 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…