मुंबई | राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा यावेळी ऑफलाइन होत आहेत.
परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केलं होतं. परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचं समोर आलंय.
कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केलं असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.
कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.
अहमदनर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचं प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
मार्चला दहावीच्या मराठीची परीक्षा होती. कोरोनाची स्थिती असल्याने आपण प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र केलं. ज्या शाळेत गैरप्रकार सुरु असल्याचं आढळलं त्याची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे असे काही प्रकार होत असतील परीक्षे केंद्र रद्द करणं तसंच पुढे कधीही त्यांना केंद्र न देणं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
“आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही”
कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, चीनने घेतला आणखी एक मोठा निर्णय’
अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; धक्कादायक माहिती समोर