मुंबई | भाजपच्या दंडात ताकत आहे असं त्यांना वाटतं. पण ते समोरून वार करत नाहीत. पाठिमागून करतात. अडीच वर्ष झाले ठाकरे सरकारला. अजून अडीच वर्ष जातील. आम्ही पुन्हा पाच वर्ष सत्तेत राहू, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपच्या (bjp) रंगात भेसळ आहे. ते भेसळीचे रंग वापरतात. त्यांच्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही. त्यांचा रंग रेड असेल किंवा इतर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावं. भाजपने. त्या पद्धतीने रंग उधळावे. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा आहे. हे तुम्ही समजून घ्यावं, असंही ते म्हणाले.
सध्या कशावरून काय होईल. त्याबद्दल न बोललेलं बरं. इतकं राजकारण बिघडवून ठेवलं आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील राजकारणातील विनोद आणि संवेदनशील मन त्यांनी बिघडवून ठेवलं हे वातावरण कधीच नव्हतं. ते दुर्देवाने भाजपने केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
“आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही”
कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, चीनने घेतला आणखी एक मोठा निर्णय’
अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; धक्कादायक माहिती समोर
‘इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य