मोठा निर्णय! ‘या’ राज्यानं दारु पिणाऱ्यांचं वय केलं कमी, कायद्यात मोठा बदल

हरियाणा | कोरोना (Corona) महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला होता. त्यामुळे सगळंच ठप्प पडलं होतं. त्यावेळी सर्वात आधी दारूची दुकानं (Liquor store) उघडण्यात आली होती.

दारूची दुकानं उघडल्यानंतर अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं होतं. तळीरामांचे त्यावेळी चांगलेच वांदे झाल्याचं दिसून आलं होतं.

दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. अशातच मद्य शरिरासाठी कितीही गातक असलं तरी त्याची पसंती काही कमी झालेली दिसत नाही.

आजही मद्यप्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आता सरकारनेच मद्यप्रेमींसाठी कायद्यात मोठा बदल केला आहे.

सरकारनं आता मद्यप्रेमींच्या वयात बदल केला आहे. वयाची मर्यादा आता 25 वर्षांवरून ही मर्यादा 21 वर्षांपर्यंत केली आहे. देशातील हरियाणा या राज्यात मद्य विक्रीच्या आणि खरेदीच्या कायद्यात मोठा बदल झाला आहे.

हा नियम राज्यात 11 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. कायद्यातील बदलानंतर, कोणत्याही देशी दारू किंवा ड्रग्जच्या निर्मिती, घाऊक किंवा किरकोळ विक्रीसाठी वयोमर्यादाही कमी करण्यात आली आहे.

कलम 30 अंतर्गत या अभ्यासानंतर 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला मद्य विक्रीच्या दुकानावर कामावर ठेवण्यात येऊ शकतं.

मद्य विक्रीच्या दुकानात आता 21 वर्षांपर्यंतची व्यक्ती नोकरी करू शकते. हरियाणाच्या सुधारित उत्पादन शुल्क विधेयकाला राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची संमती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

  “गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब”

“लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र 

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! शिवसेनेने केली महिला आयोगाकडे तक्रार

 “सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”