मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

मुंबई | माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हे आपण अनकेदा ऐकलं आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे पण अद्यापही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मराठी भाषेत वर्षानुवर्षे साहित्यांची निर्मिती करण्यात आली. साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा प्रत्येकाच्या मनात रूजली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मात्र आपल्याला संघर्ष करावा लागत आहे.

राज्याचे उद्योग आणि सांस्कृतिक भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या शिष्टमंडळासह केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची नुकतीच भेट घेतली आहे.

राज्य सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

किसन रेड्डी आणि महाराष्ट्राच्य शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं देसाई म्हणाले आहेत. परिणामी लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास सरकार उशीर लावत असल्याची टीका केली होती.

केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सरकारकडून बाजू मांडली होती. आंतर मंत्रालयीन स्तरावर सकारात्मक चर्चा चालू आहे. परिणामी लवकरच निर्णय होण्याची शक्यता अर्जुन मेघवाल यांनी बोलून दाखवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही राज्याच्या मागणीला योग्य प्रतिसाद दिला आहे. परिणामी लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  “गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब”

“लक्षात ठेवा, गाठ धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र 

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! शिवसेनेने केली महिला आयोगाकडे तक्रार

 “सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 104 टक्के पाऊस होणार!