मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…

जालना | काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संतप्त गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सिल्वर ओक निवासस्थानी हल्ला केला होता. त्यावेळी चपला आणि शाहीफेक देखील करण्यात आली होती.

सिल्वर ओकवर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. भाजपने देखील यावर निषेध नोंदवला होता. अशातच आता शरद पवार यांच्या सभेत गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे.

जालन्यातील अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या एका प्रकल्पाचं उद्धाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी भाषण देखील केलं. पवारांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक एक व्यक्ती सुरक्षा कवच तोडून मंचावर आली. पोलिसांनी या व्यक्तीला पाहिल्यानंतर त्याला तात्काळ अडवलं आणि ताब्यात घेतलं आहे.

या व्यक्तीने सुरक्षा कवच तोडल्यानंतर आता सभेच्या ठिकाणी काहीवेळ गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मात्र, पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, हा व्यक्ती मंचावर कशासाठी जाण्याचा प्रयत्न करत होता, याचा तपास आता पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2022: कमाल लाजवाब राहूल! मुंबई इंडियन्स विरूद्ध के एल राहूलचं दमदार शतक

मुंबई-हरिद्वार-हिमायल! चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीकडून ‘एसी थ्री टायर’ तिकीट बूक

“…तर चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाईल”

kolhapur Bypoll Result: पराभवानंतर सत्यजीत कदम यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

“चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का?”, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा म्हणाले…