मुंबई | कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत मविआच्या जयश्री जाधव यांनी दिमाखात विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव करत जयश्री जाधव कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पहिल्या आमदार झाल्या आहेत.
अशातच या निवडणूक निकालावरून आता राज्यात टीका प्रतिटीका सुरू झाली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपला या निवडणुकीत मते जवळजवळ दुपटीने वाढवली असल्याचं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
शिवसेना मतदारसंघ आणि मते दोन्ही गमावले, असा टोला उपाध्ये यांनी लगावला होता. तर टीव्हीवर येत एकजण नाचतोय, अशी टीका देखील उपाध्ये यांनी केली होती. त्यावर आता मिटकरींनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.
अहो महोपाध्याय सुतकातून जरा सावरा.. तुमची ही प्रतिक्रिया म्हणजे सुंभ जळला मात्र पिळ कायम, अशी झाली आहे. आता “वानप्रस्थ स्वीकारा” हिमालयात जाऊन या, असं अमोल मिटकरी म्हणाले.
कोल्हापूरच्या मातीने इतिहास घडवून मविआच्या जयश्री जाधव यांना आशिर्वाद देऊन भाजपा मुक्त जिल्हा केल्याबद्दल जोरदार अभिनंदन, असंही मिटकरी म्हणाले.
हनुमान जयंतीला महावीर हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेल्या या आशीर्वादाचा हनुमान चालीसेत उल्लेख आहे “भुत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे”, असं म्हणत मिटकरींनी टोला लगावला आहे.
दरम्यान, गोवा निवडणुकीच्या विजयानंतर नागपूरमध्ये रोड शो घेऊन स्वतःच मोठेपण सिद्ध करू पाहणारे देवेंद्र फडणवीसजी कोल्हापूरच्या निकालानंतर कुठे फ्लॉप शो घेणार आहात ते कृपया कळवा, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना चिमटे काढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! शरद पवारांच्या सभेत गोंधळ; जालन्यात भाषण सुरू असताना…
IPL 2022: कमाल लाजवाब राहूल! मुंबई इंडियन्स विरूद्ध के एल राहूलचं दमदार शतक
मुंबई-हरिद्वार-हिमायल! चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीकडून ‘एसी थ्री टायर’ तिकीट बूक
“…तर चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाईल”
kolhapur Bypoll Result: पराभवानंतर सत्यजीत कदम यांचा गंभीर आरोप, म्हणाले…