मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंना (BJP MLA Nitesh Rane) अडचणींचा सामना करावा लागतोय. नितेश राणे यांना सध्या शिवसैनिक हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावपळ केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर नितेश राणे सत्र न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

अशातच नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने सुनावणी करत नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

मंगळवारी पुन्हा एकदा नितेश राणेंच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद पार पडला.

न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर कणकवली तालुक्यात त्यांना येण्यास बंदी घातली आहे.

नितेश राणे हे पूर्वापासूनच या प्रकरणात पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत, असं नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर त्यांना जामीन मंजुर झाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका, अत्यंत धक्कादायक माहिती समोर