भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट समोर

मुंबई | पुण्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमली होती. या प्रकरणावर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर आपलं मत मांडलं होतं. भीमा कोरेगावचा हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं शरद पवार म्हटले होते.

त्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तर या प्रकरणात अॅड प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी रितसर मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अशातच आता शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जुलैमध्ये त्यांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

त्यानंतर आता पुन्हा 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, या प्रकरणावर आता शरद पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

“माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट